श्री. नामदेव चौरे, निर्मित नाशिक मनपा शिक्षण विभागातील पहिल्या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५

नमस्कार मित्रांनो,
           आपल्या समोर "शिक्षक मित्र" ब्लॉग  सादर करतांना आनंद होतो आहे की, याद्वारे शिक्षकांच्या online कामाच्या काही समस्या सोडवण्यास मदत होईल.
          आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रात मोठा वापर वाढलेला आहे त्याला शिक्षण क्षेत्र ही अपवाद नाही. आज शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणित वापर वाढला आहे. त्यासाठी शिक्षकांना तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. शिक्षकांना दैनिक online ची कामे करावी लागतात. त्यासाठी वरील संकेतस्थळाद्वारे शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण websites एकाच व्यासपिठावर उपलब्ध करुन देण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे . हया ब्लॉगची ही सुरुवात आहे त्यात आणखी सुधारणा करंण्यासाठी आपल्या सुचना पाठवाव्यात. आपल्या सर्व सुचनांचे स्वागत आहे.
           ज्या शिक्षक बांधवांजवळ चांगल्या कल्पना असतील व त्या आपल्या बांधवांना उपयोगी असतील तर  पाठवा. त्या आपल्या नावानिशी संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या जातील. वरील ब्लॉगविषयी आपले मत अवश्य नॊंदवा.